मानसिक आरोग्य म्हणजे काय ?



प्रस्तावना

जसे पोटात दुखतं, हात पाय दुखतात तसेच मनाचेही दुखणे असू शकते, पण शारीरिक दुखणे हे दिसते, पटकन लक्षात येते, पण मानसिक आजार दिसतही नाहीत आणि पटकन लक्षातही येत नाहीत. मानसिक आजारांबद्दल समाजामध्ये अनेक चुकीच्या आणि वाईट समजुती आहेत.

मानसिक आजार म्हणजे फक्त वेड लागणे अशी एक गैरसमजूत आपल्या समाजात आहे आणि वेड लागले म्हणजे वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही असा समज आहे.

पण मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाने, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे.

मानसिक आरोग्य चांगले असण्याची लक्षणे –

  • त्या माणसाचे मन शांत असते.
  • इतरांबरोबर जुळवून घेता येते.
  • कोणी नावे ठेवली , कोणी उदणीदुणी केली तरीही दुखावले न जाणे.
  • आपल्या प्रश्नांना आपणच उत्तर शोधणे.
  • आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे ते ठरवणे.
  • मनावर ताबा असणे.
  • जीवनातले ताण-तणाव, काळजी सहन करण्याची क्षमता असणे.


मानसिक आरोग्य चांगले राहण्याकरिता –

  • योग्य, पुरेसा आणि वेळेत आहार घेणे.
  • स्वतःचीच व परिसराची स्वच्छता ठेवणे.
  • चांगल्या सवयी लावून घेणे- धुम्रपान, मद्यपान न करणे.
  • नियमित व्यायाम करणे.
  • ताणताणाव व काळजी कमी करणे.

कोणत्याही रोगाची साधीसाधी वाटणारी लक्षणे दिसून आली तरीही लगेचच योग्य लगेचच त्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो औषधोपचार सुरु करावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या तपासण्याही करून घ्याव्यात. दुखणं अंगावर काढू नये. कारण तसे केल्याने बरे होण्यासाठी वेळही जास्त लागू शकतो आणि खर्चही जास्त येऊ शकतो.