वाहनधारकांनो लक्ष द्या ! लायसन्ससाठी एमबीबीएस डॉक्‍टरांचे सर्टिफिकेट बंधनकारकच

 वाहनधारकांनो लक्ष द्या ! लायसन्ससाठी एमबीबीएस डॉक्‍टरांचे सर्टिफिकेट बंधनकारकच

🧾 चाळीस वर्षापुढील व्यक्तींना वाहन परवाना काढताना एमबीबीएस डॉक्टरचे ऑनलाईन सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात आले आहे.

👨🏻‍⚕️ एमबीबीएस डॉक्टरला आरटीओ कार्यालयतर्फे यूडीआय नंबर दिला जाईल व तो डॉक्टर दिवसातून फक्त वीस जणांना प्रमाणपत्र देऊ शकेल, अशी सोय  करण्यात आली आहे, असे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

🚙 वाहनधारकांनी 'या' गोष्टींची काळजी घ्या : 

👉 आपण नवीन वाहन खरेदी करतो तेंव्हा दिलेला मोबाईल क्रमांक सुरु आहे किंवा नाही हे प्रत्येक वाहनधारकांनी तपासणे आवश्‍यक आहे. अन्यथा दंडाच्या रकमेचा भुर्दंड वाहनधारकांना बसणार आहे.

📍 ऑनलाईन कारवाई: 

👉 एखाद्या वाहनधारकांने सिग्नल तोडल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून त्यांच्या नंबर प्लेटचा फोटो काढला जातो आणि ऑनलाईन पध्दतीने कारवाई केली जाते.

👉 अनेकदा वाहनधारक वाहनखरेदीवेळी दिलेला मोबाईल क्रमांक बदलतो यामुळे दंडाच्या रकमेकवर विलंबाचा शुल्क वाढत जातो. त्यामुळे दंडाच्या रकमेचा भुर्दंड वाहनधारकांना बसण्याची शक्‍यता आहे. 

📱 आरटीओतच मोबाईल नंबर अपडेटची सोय:

👉 वाहन खरेदीवेळेला नोंदणी केलेला मोबाईल नंतर बंद असेल तर तुमचा चालू मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची सोय आरटीओने करून दिली आहे. 

👉 भविष्यात ही समस्या जाणवू नये यासाठी यापुढे वाहन नोंदणी करताना आधार कार्ड व पॅन कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.