कानाची काळजी कशी घ्यावी कानाचे आजार माहिती मराठी



कानाची माहिती मराठी . कानाची काळजी कशी घ्यावी कानाचे आजार माहिती मराठी. कानाची निगा.  कानाचे आजार व घरगुती उपचार

ऐकताय ना, हो. म्हणजे ऐकू येतय. पण काहीना कमी ऐकू येत. असं का बर? आपल्या शरीरातला कम्युनिकेशनसाठी वापरला जाणारा महत्वाचा अवयव म्हणजे कान. काही लोकांनी त्यांचा निष्काळजी पणामुळे स्वताचे कान खराब केले. कानाने एकू कमी येणे, काही शब्दांचा उच्चार वेगळाच एकू येणे किंवा पूर्णपणे कर्णबधिरता या समस्या बऱ्याच लोकांमध्ये आढळतात.


काही लोकांना मिळेल त्या टोकदार वस्तूने कान टोकरण्याची वाईट सवय आहे. यात गाडीची चावी, पेन, पेन्सिल, अश्या प्रकारचा इतर वस्तूंनी कान टोकरतो. पण यामुळे कानाच्या पडद्याला इजा व कानात जंतू संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. कानाची खाज, गुदगुद कमी करण्यासाठी सतत कान टोकरणे चुकीचे आहे.
याच बरोबर अँलार्जी, सर्दी, सिगारेट ओढणे. या गोष्टींमुळे देखील कानात जंतू संसर्ग होऊ शकतो.


Eustachian tube ही कान आणि घसा जोडणारी छोटीशी नळी आहे. ही ट्यूब ब्लाँक झाल्याने कानात जंतू संसर्ग होतो.
कानावर पाणी, वारा, आवाज, धूळ यांचा जोरदार आघात होणे. कानाशी केलेली चेष्टा महागात पडते. रंगपंचमीला कानात फक्त पाणी ओतल्याने कानाचा पडद्याला इजा झालेल्या केसेस मी पहिल्या आहेत.
कानाची काळजी कशी घ्यावी कानाचे आजार माहिती मराठी

बर्‍याचदा आपल्याला शेजारी कोणी काही म्हटलेलं आपल्याला ऐकायला येत नाही. ही गोष्ट आपल्या नकळत होत असते मात्र काही वेळा समोरची व्यक्ती बोलते एक आणि आपण ऐकतो एक त्यामुळे आपले हसूही होते मात्र यामुळे नेमके काय झाले हे काही क्षणतरी अनाकलनीय असते. हा देखील बहिरेपणाचा प्रकार असू शकतो का असा प्रश्‍न आपल्याला बहूदा पडतो, मात्र या गोष्टी

जगात बहिरेपणाच्या त्रासाने त्रस्त झालेल्यांची संख्या काही कोटीच्या घरात आहे. काही लोकांना जन्मत: कमी ऐकायला येते, तर वयोमानानुसार काहींना हा त्रास सुरू होतो. बर्‍याचदा 30-40 वयात बहिरेपणा येतो. ग्रामीण भागात बहिरेपणाकडे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि तो वाढल्यानंतर त्यावर उपाय करण्यासाठी धाव घेतात.



बहिरेपणा आल्यानंतर व्यक्ती बर्‍याचदा दुसर्‍यांशी बोलणे टाळतात, आवश्यक तेवढेच बोलतात. अशातच निराश व कमीपण वाटत असल्याने इतरांसून दूर राहणे जास्त सोइस्कर  वाटते. परित्यक्त जीवन जगतो, आपल्याला ऐकण्यास कमी किंवा येत नाही अशी भावना झाल्यानंतर,  हा मानसिक ताण इतका असह्य होतो की, त्यांस क्तदाबाचा विकार जडण्याची दाट शक्यता अससते.

बहिरेपणाचे प्रकार


  • प्रवाही बहिरेपणा
  • मज्जातंतूचा बहिरेपणा
  • प्रवाही बहिरेपणा

हा प्रकार मध्य कर्णातील हाडे एकमेकांत घट्ट बसल्यामुळे होता. मध्यकर्णातील हाडे घट्ट बसल्यामुळे पडद्यावर आवाज आदळून कंपन आंतरकर्णापर्यंत व्यवस्थित पोहचत नाही. त्यामुळे कमी कंपनाचे शब्द उदा. बाबा, मामा, दादा व्यवस्थित ऐकू येत नाहीत. यावर माणसाची प्रकृती सुदृढ असल्यास ऑपरेशन शक्य आहे, नाहीतर श्रवणयंत्राने चांगला फायदा होतो.

मज्जातंतूचा बहिरेपणा
या प्रकारात वेसीलर मेसब्रेनच्या तंतूचा नाश होत असतो. निमुळत्या टोकावरील तंतू नष्ट झाल्याने असा बहिरेपणा येतो. त्यामुळे क्ष, स, श, थ, फ आणि व या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द व्यवस्थित ऐकू येत नाहीत. यावर एकमेव उपाय म्हणजे श्रवणयंत्र लावणे.

संमिश्र बहिरेपणा
संमिश्र बहिरेपणामुळे प्रवाही व मज्जातंतू असे दोन्ही प्रकारचे बहिरेपणा असते. याला याशिवाय विविध कारणांमुळे बहिरेपणा येतो.


  • कर्णनलिका लहान असल्याने

  • कानात मळ साचल्याने

  • कानाच्या पडद्याला भोक असल्याने

  • कानातून पू येणे

  • म्हातारपण

  • तापात जास्त प्रमाणात अँटी-बायोटेक्स घेतल्यामुळे

  • जन्मत: बहिरेपणा

  • डोक्याला मार बसल्यामुळे

  • सतत यंत्राची घरघर ऐकल्यामुळे

  • तापाने येणारा बहिरेपणा

  • सर्दी झाल्यामुळे येणारा बहिरेपणा

  • श्रवणयंत्राचे सर्वसाधारणपणे चार प्रकार असतात.

  • पॉकेट मॉडेल

  • कानामागचे अदृष्य मॉडेल

  • चष्म्याच्या दांडीत असते

  • कानातील मॉडेल (आय.टी.सी.) अत्यंत लहान व अदृष्य


मशीन लावल्यानंतर 80 टक्के लोकांना ताबडतोब व्यवस्थित ऐकू येते. बाकी 20 टक्के लोकांना थोडे जास्त दिवस लागतात.

कानांची निगा कशी राखाल  


  • सकाळी अंघोळ झाल्यानंतर कान सुती कापडाने निट पुसून घ्यावेत.
  • घराबाहेर पाडताना दुचाकी प्रवासात कानाला रुमाल बांधावा. हेल्मेट असेल तर उत्तमच.
  • कानात तेल सोडू नये.
  • सतत हेडफोन घालून एकू नये.
  • बहिरेपणावर डॉक्टरांचा सल्ल्याने उपचार घ्यावेत.